पेंटाग्राफ अडकल्याने तासभर रेल्वे वाहतूक खोळंबली
लोकलसेवेचे वाजले तीन तेरा, वारंवार घटना घडल्याने प्रवाशांचे हाल

पेंटाग्राफ अडकल्याने तासभर रेल्वे वाहतूक खोळंबली लोकलसेवेचे वाजले तीन तेरा, वारंवार घटना घडल्याने प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान पुन्हा एकदा कारशेडला जाणाऱ्या लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना गुरुवारी (ता.४) घडली. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल वाहतूक तासभर खोळंबली होती. यामुळे मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत होऊन एकामागे एक लोकल उभ्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून सुटलेली रिकामी लोकल कल्याण कारशेडला जात होती. त्यावेळी ठाकुर्ली ते कल्याण स्थानकादरम्यान क्रॉसओव्हर करताना ओव्हरहेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्राफ अडकून तुटला. त्यामुळे लोकलमधील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. ही घटना मध्य रेल्वेला समजताच अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पेंटाग्राफ तुटलेल्या लोकलला इंजिन जोडून ती कल्याण कारशेडमध्ये आणण्यात आली. रेल्वेकडून हा बिघाड दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी दुरुस्त करण्यात आला; मात्र तासाभराच्या झालेल्या बिघाडामुळे रल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.

गाड्यांचे उशीरा आगमन
वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने सीएसएमटीवरून खोपोलीकडे जलद मार्गावरून जाणारी लोकल ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळे २० मिनिटे उशिराने त्या लोकलचे आगमन झाले. तर खोपोली लोकल अंबरनाथ स्थानकात एक वाजून ३८ मिनिटांनी येण्याची वेळ होती; मात्र लोकल दोन वाजून ३६ मिनिटांनी स्थानकात दाखल झाली. मागील आठवड्यातही दुपारी एकच्या दरम्यान ठाणे-बदलापूर लोकल वेळेत सुटूनही ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान रखडली होती. कल्याणवरून पुढे रवाना झाल्यानंतर विठ्ठलवाडी यार्डातून कर्जतच्या दिशेने मालगाडीला प्राधान्य दिल्याने वेळेवर धावणारी बदलापूर लोकल अर्धा तास उशिराने धावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com