उन्हाळ्यासाठी टाटा पॉवर सज्‍ज

उन्हाळ्यासाठी टाटा पॉवर सज्‍ज

उन्हाळ्यासाठी टाटा पॉवर सज्‍ज
- विजेच्या वाढत्‍या मागणीचे नियोजन सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : तापमानाचा पारा ३८ अंशावर गेल्याने विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. पुढील दोन-अडीच महिन्यात मुंबईची विजेची मागणी चार हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे टाटा पॉवरची सध्या ७००-८०० मेगावॉटच्या घरात असलेली विजेची मागणी १०३० मेगावॉटपर्यंत वाढू शकणार आहे. मुंबईला अखंड वीजपुरवठा करता यावा, यासाठी टाटा पॉवरने आपल्या जनरेशन, संक्रमण आणि वितरण विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
टाटा पॉवरने विजेच्या मागणीमध्ये होत असलेल्या वाढीच्या व्यवस्थापनासाठी संपूर्ण तयारी केली आहे. विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अनुमान लावण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग टूल्स तैनात करण्यात आली आहेत.
मुंबई वितरण विभागाने वीज खरेदी करार असलेल्या सर्व वीजनिर्मिती प्रकल्पांना पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्णपणे उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्‍या टीमला कामासंदर्भात प्रशिक्षण दिले आहे.
या काळात बिलिंग आणि वीज वापरासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनीची सर्व कॉल सेंटर्स व १० कस्टमर केअर कार्यरत असणार आहेत.

सवलतीत उपकरणे
विजेची मागणी जास्त असताना वीज बचत करून मागणी समतोल ठेवता यावी, यासाठी विजेची बचत करणारी सिलिंग फॅन, एअर कंडिशनर, एलईडी ट्यूब लाईट्स आणि रेफ्रिजरेटर अशी विद्युत उपकरणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय टाटा पॉवरने घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com