ST News
ST Newssakal

ST News: सुट्टीच्या हंगामात एसटीला फटका; बसेसची संख्याच कमी

सद्यःस्थितीत १५ हजार बस उपलब्ध असून त्यापैकी एक हजार सुस्थितीत नसल्याने गाड्यांच्या कमतरतेमुळे सुट्टीच्या हंगामात एसटी वाहतुकीला फटका बसणार आहे | As of now, 15 thousand buses are available, out of which 1 thousand are not in good condition and due to shortage of trains, ST traffic will be hit during the holiday season.

ST News: उन्हाळी सुट्यांच्या हंगामात गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाला १८ हजार बसची गरज आहे. पण सद्यःस्थितीत १५ हजार बस उपलब्ध असून त्यापैकी एक हजार सुस्थितीत नसल्याने गाड्यांच्या कमतरतेमुळे सुट्टीच्या हंगामात एसटी वाहतुकीला फटका बसणार आहे.

ST News
ST News: हॉटेल चालकांकडून लूट सुरूच, दोन इडल्या ८० तर वडापाव ५० रु..!

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी एसटीवरच अवलंबून आहे. अशातच १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी सुट्यांच्या हंगामात मूळ गावी अथवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होते.

यासाठी रेल्वे, एसटी बस आरक्षण करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी एसटी महामंडळाने दररोज एसटीच्या एक हजार ८८ बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिलपासून टप्प्या-टप्प्याने या बस सोडण्यात येणार आहेत.

ST News
ST News: अवैध प्रवासी वाहतुकीची एसटीला झळ; प्रवासी संख्या होतेय कमी

पण कित्येक आगारात पुरेशा बस उपलब्ध नाहीत. काही आगारात रंग उडालेली वाहने असल्याने बिघाड होणार नाही तसेच यांत्रिक दोषामुळे कोणताही अपघात होणार नाही, या दृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.


उन्हाळी सुट्यांमध्ये मूळ गावी, पर्यटनस्थळी, देवदर्शनाला जाण्याकडे अनेकांचा कल असतो. या काळात एसटीच्या पर्यायाला अनेकांकडून पसंती दिली जाते; परंतु सरकार फक्त घोषणा करत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसतो.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com