मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मालवाहतूक !

मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मालवाहतूक !

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेने आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये ८९.२४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट मालवाहतूक असून गेल्या आर्थिक वर्षाच्या ८१.८८ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे पर्यावरणपूरक वाहतुकीद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करण्यात नेहमीच आघाडीवर आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ (एप्रिल- २०२३ ते मार्च) ८९.२४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. मार्च-२०२४ मध्ये ९.०४ दशलक्ष टन मालवाहतूक केली, तर मार्च-२०२३ मध्ये ८.६९ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. ४.०२ टक्यांच्या वाढीसह हा मार्च महिन्यातील आतापर्यंतचा सर्वोत्तम मालवाहतुकीचा आकडा आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८९.०५ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लक्ष्य ही ओलांडले आहे. उल्लेखनीय मालवाहतूक कामगिरीमधून मध्य रेल्वेला ९,४४६ कोटी रुपयांच्या महसूल गोळा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १,००७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
…...
गेल्या वर्षीच्या १,५१४ रेकच्या तुलनेत १,९२७ स्टीलचे रेक (२७.३ टक्क्यांची वाढ)
गेल्या वर्षी १,०२० रेकच्या तुलनेत ऑटोमोबाईल्सचे १,१७८ रेक (१५.५ टक्क्यांची वाढ)
गेल्या वर्षी ९,७३९ रेकच्या तुलनेत १०,६३९ कोळशाचे रेक (९.२ टक्क्यांची वाढ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com