जीएस महानगर बँकेच्या नफ्यात १३ कोटींची वाढ

जीएस महानगर बँकेच्या नफ्यात १३ कोटींची वाढ

जीएस महानगर बँकेच्या नफ्यात १३ कोटींची वाढ

मुंबई, ता. ४ ः रिझर्व्ह बँकेने सक्षम बँकांसाठी नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करीत जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मागील वर्षापेक्षा १३ कोटींनी वाढून ३४ कोटी इतका झाला आहे. बँक नक्त एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यशस्वी झाली आहे. तसेच बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ठेवी २,८८५ कोटी, एकूण कर्ज १,५६४ कोटी असा एकूण ४,४४९ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बँक सर्व स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करीत असून बँकेचा लौकिक व विश्वासार्हता बँकेने कायम टिकवून ठेवली आहे, अशी माहिती जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमन गुलाबराव शेळके यांनी दिली. दरम्यान, बँकेचे सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्या सक्रिय सहकार्याने ही प्रगती शक्य झाल्याचे सांगून त्या सर्वांचे व बँकेचे अधिकारी, कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे सुमन गुलाबराव शेळके यांनी बँकेच्या वतीने आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com