मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली
महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा फायदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक ७०पर्यंत नोंदविण्यात आला आहे. सखोल स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलिकण कमी होऊन वायू गुणवत्ता सुधारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
सखोल स्वच्छता मोहीम डिसेंबर २०२३पासून राबविण्यात येत आहे. सलग १८ आठवड्यांपासून महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील वायुप्रदूषण कमी करण्याच्या प्रमुख हेतूने महापालिकेने ही मोहीम सातत्याने राबवली आहे. यामुळे मुंबईतील वायुप्रदूषण कमी झाले असून, नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबईत स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातूनच मुंबई नगरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातून एका निवडणूक प्रभागात विभागातील सर्व यंत्रणा एकवटून गत चार महिन्यांपासून स्वच्छता मोहीम राबवत आहे. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे काही विभागात महिन्यातून एकदा, तर काही विभागांत दोन महिन्यांतून एकदा सखोल स्वच्छता राबवली जात आहे. यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा स्तर आणखी उंचावला आहे.
...
मोहीम सुरू राहणार
पालिकेच्या सर्व विभागांत ३० मार्चला सखोल स्वच्छता मोहीम राबविली गेली. या मोहिमेत महापालिकेच्या १,४७७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच महापालिकेच्या वेगवेगळ्या संयंत्रांचाही वापर करण्यात आला. सुमारे ५५६ किलोमीटर इतक्या लांबीचे रस्ते धुवून स्वच्छ करण्यात आले. यादरम्यान ७० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन झाले, तर १.५९ टन इतकी माती उचलण्यात आली. तसेच १०६.४ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. यापुढेही ही मोहीम सतत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com