salman khan eid
salman khan eidesakal

Salman Khan Eid : सलमान बाल्कनीत येताच चाहत्यांमध्ये चढाओढ; पोलिसांनी केला लाठीमार, काय घडलं नेमकं ?

Ramzan Eid: देशभरात गुरुवारी सर्वत्र उत्साहात ईद हा सण साजरा करण्यात आला.

मुंबई, ता. ११ : रमजान ईदनिमित्त बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गुरुवारी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

देशभरात गुरुवारी सर्वत्र उत्साहात ईद हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या निवासस्थानाबाहेर चाहते मोठी गर्दी करतात. याही वर्षी सलमानची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. ही गर्दी आवरणे पोलिसांना कठीण झाल्याने त्यांच्यावर सौम्य लाठीमार करण्याची वेळ आली. (ramzan eid marathi news)

salman khan eid
Ramzan Eid 2024 : नमाजपठणानंतर फडकवला पॅलेस्टिनी ध्वज

दरम्यान, त्याच्या ५७ व्‍या वाढदिवसालाही चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. २६ डिसेंबरला वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीवेळी चाहत्यांनी केलेल्या गर्दीवर नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. सलमान खान बाल्कनीत येताच चाहत्यांमध्ये त्याला पाहण्यासाठी चढाओढ लागून गर्दी अनियंत्रित झाली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्याने तेव्हाही लाठीमार करावा लागला होता.‍

salman khan eid
Eid-ul-Fitr 2024: ईद देते समानता, प्रेम, बंधुभावाचा संदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com