Mumbai News: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा; वाचा नक्की काय प्रकरण
Mumbai Newssakal

Mumbai News: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा; वाचा नक्की काय प्रकरण

Published on

Mumbai News: अंशकालीन अभ्यासक्रमाच्या आठपैकी सहा सेमिस्टर दिल्यानंतर मुलांचे प्रवेश रद्द केल्याने याप्रकरणी उच्च अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कॉलेजच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे मत नोंदवत उच्च न्यायालयाने सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजचा आदेश रद्दबातल ठरवला आहे.(mumbai highcout news)

Mumbai News: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा; वाचा नक्की काय प्रकरण
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

पुण्याच्या सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या ५२ विद्यार्थ्यांच्या अनुभव प्रमाणपत्रावर शंका उपस्थित करीत त्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते.

याप्रकरणी विनायक मत्रेसह पाच विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात अॅड. महालिंग पंदारगे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

Mumbai News: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा; वाचा नक्की काय प्रकरण
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

या वेळी प्रवेश दिल्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर प्रवेश रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले.

कॉलेज व राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अॅड. एन. सी. वाळिंबे यांनी बाजू मांडत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली.

तसेच तांत्रिक क्षेत्रात अनुभव असण्याचा पात्रता निकषच विद्यार्थ्यांनी पूर्ण केला नसल्याची बाब खंडपीठासमोर मांडली होती; पण दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने प्रवेश रद्द करण्यासंबंधी कॉलेजचा १८ नोव्हेंबर २०२३ चा आदेश रद्द ठरवत विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करू देण्याचे निर्देश कॉलेज प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com