Mumbai Local News
Mumbai Local Newssakal

Mumbai Local News: सिग्नल बिघाडामुळे मध्य रेल्वेवर खोळंबा; वेळापत्रकाचे तीनतेरा

Mumbai News: मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजता घडली. त्यामुळे अंबरनाथ लोकलला हिरवा सिग्नल न मिळाल्याने लोकल सेवा रखडली.

त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या बदलापूरकडे जाणाऱ्या लोकल सेवा वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले होते. परिणामी प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. त्यामुळे अंबरनाथला जाणाऱ्या लोकलला हिरवा सिग्नल मिळत नव्हता.

बऱ्याच वेळ रेल्वे रुळावर लोकल उभी होती. त्यामुळे कल्याणकडे बदलापूरला जाणारी लोकल सेवा खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी पोहोचून बिघाड दुरुस्त केला. मात्र, तासभर सिग्नल यंत्रणेचा बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com