Crime News
Crime Newssakal

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; गव्हाच्या पोत्याखाली लपवून आणलेला ९ लाख किमतीचा गुटखा जप्त

Navi Mumbai News: गव्हाच्या पोत्याखाली लपवून आणला गेलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा पकडण्यात तुर्भे पोलिसांना यश आले आहे.

याची किंमत ९ लाख ५० हजार रुपये आहे. तसेच २० लाख रुपये किमतीचा ट्रकही यात जप्त करण्यात आला आहे. हा साठा मध्य प्रदेशमधून नवी मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) केलेल्या या कारवाईत ट्रकचालक व गुटखा घेण्यासाठी आलेला खरेदीदार या दोघांनाही अटक केली गेली आहे.

Crime News
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा घेऊन एक ट्रक पावणे एमआयडीसीमध्ये येणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश येवले व त्यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २३) दुपारी सापळा लावला होता.

दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक शैलेश दयाल सिंग (वय २७) हा मध्य प्रदेश येथून आपल्या ट्रकमधून गव्हाच्या पोत्याखाली गुटख्याचा साठा लपवून आला होता. या वेळी आरोपी अनिरुद्ध महेश्वरी याच्या सांगण्यावरून गुटख्याचा साठा ताब्यात घेण्यासाठी रिपन रंजन देव (वय २४) हा गेला होता.

Crime News
Crime News: लाईट बिल जास्त... महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार; महिलेचा मृत्यू, बारामतीतील धक्कादायक घटना

पोलिसांनी संशयित ट्रकची तपासणी केली असता, गव्हाने भरलेल्या पोत्याखाली प्रतिबंधित असलेला तब्बल ९ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी ट्रकचालक शैलेश सिंग व रिपन देव या दोघांना अटक केली. गुटख्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या अनिरुद्ध महेश्वरी व पवन गुप्ता या दोघांचा शोध सुरू आहे.
-- --

Crime News
Ajit Pawar: शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; EOW कडून अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीनचीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com