Builder Ajit Pawar, who was arrested in the case of forced robbery in a bungalow in College Road area, is a suspect
Builder Ajit Pawar, who was arrested in the case of forced robbery in a bungalow in College Road area, is a suspectesakal

Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

Crime News : शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला रिकामा करण्यासाठी प्रतिथयश बिल्डरने बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करणाऱ्यांना सुपारी दिली.

Nashik Crime News : शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला रिकामा करण्यासाठी प्रतिथयश बिल्डरने बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करणाऱ्यांना सुपारी दिली. एका विधीसंघर्षितासह चौघांनी बंगल्यातील वयस्क दाम्पत्याला घाबरविण्यासाठी त्यांच्यावर गेल्या आठवड्या प्राणघातक हल्ला केला आणि जबरी लुट केली.

मात्र शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार गुन्ह्याचा तपास करीत उकल केली आणि बिल्डर अजित प्रकाश पवार यांच्यासह दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील बिल्डर ‘लॉबी’वर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना, आता जागा हडपण्यासाठी ‘गुन्हेगारी’चा मार्ग अवलंबत आहेत, ही बाब धक्कादायक मानली जात आहे. (Nashik Crime Builder gave contract to usurp bungalow marathi news)

संशयितांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. समवेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक मधुकर कड व पथक.
संशयितांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. समवेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक मधुकर कड व पथक.esakal

गंगापूर रोड परिसरातील पाईपलाईन रोड परिसरात ‘यशोदा’ या नावाने गृह व व्यावसायिक प्रकल्प उभारणाऱ्या अजित प्रकाश पवार (रा. लक्ष्मीनगर, कॉलेजरोड) याच्यासह संदीप भारत रणबावळे (रा. कुलकर्णी गार्डनजवळ, शरणपूर रोड. मूळ रा. करंजी गरड, ता. रिसोड), महादेव बाबुराव खंदारे (रा. डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

तर, विधीसंघर्षित बालकाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अरुण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे या संशयितांचा शोध सुरु आहे. चोरीचा मुद्देमाल व दुचाकी असा १ लाख १४ हजार ७२० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, रमेश कोळी, मिलिंद परदेशी, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांनी कामगिरी बजावली.

१६ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमार पाच संशयितांनी कॉलेजरोड परिसरातील तपस्वी बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केली. तसेच घरातून मालमत्तेची कागदपत्रे, मोबाईल, दागिने असा ऐवज लुटून पसार झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  (latest marathi news)

Builder Ajit Pawar, who was arrested in the case of forced robbery in a bungalow in College Road area, is a suspect
Jalgaon Crime News: आईच्या साक्षीने पित्यासह भावाच्या खुन्यास जन्मठेप! वार्धक्यात एकाकी जीवन नशिबी; न्यायासाठी आई बनली कठोर

एकमेव बंगला खुपला

कॉलेजरोड परिसरात शशिकुमार तपस्वी यांचा ‘तपस्वी’ हा एकमेव बंगला असून आसपास कर्मशियल कॉम्प्लेक्स उभे राहिले आहेत. त्यामुळे या बंगल्यावर संशयित बिल्डर अजित पवार याचा डोळा होता. तपस्वी दाम्पत्याच बंगल्यात राहतात. त्यांची मुले परदेशात आहे.

त्यामुळे त्यांना धमकावले वा भिती दाखविली तर ते बंगला विकून परदेशात जातील, असा कयास बांधून संशयित बिल्डर अजित पवार याने, तपस्वींना धमकावून बंगला खाली करून दिल्यास संशयितांना ८ ते १० टक्के कमिशन देण्याची कबुल केले आणि त्यांना तशी सुपारीच दिली.

दुचाकीवरून संशयितापर्यंत

पोलीस तपास करताना बंगल्याच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यात काही मिळाले नाही. लांबच्या एका सीसीटीव्हीत एक संशयित पायी पळताना दिसला. त्यावरून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले. त्यात एका दुचाकीवरून (एमएच १८ ई ६०८९) तिघे रात्री आले परंतु पळून जाताना ते दुचाकी सोडून गेले.

ती दुचाकी १७ तारखेला सकाळी घेऊन गेला. त्याच दुचाकीचा चौका-चौकातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग केला असता, ती कुलकर्णी गार्डन परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मिळाली. सीसीटीव्हीतील संशयित बांधकाम इमारतीत वॉचमन होते. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तिसरा संशयित डिसुजा कॉलनीत वॉचमन करणाऱ्यास अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच ‘यशोदा’चा बिल्डर अजित पवारचे नाव समोर आले.

Builder Ajit Pawar, who was arrested in the case of forced robbery in a bungalow in College Road area, is a suspect
Nashik Fraud Crime : पसार बिल्डर्सविरोधात ‘लूकआउट' नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com