किंगकाँग नगरमध्ये अनधिकृत बांधकाम

किंगकाँग नगरमध्ये अनधिकृत बांधकाम

किंगकाँगनगरमध्ये अनधिकृत बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे पालिका आयुक्तांनी शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना दुसरीकडे घोडबंदर भागातील किंगकाँगनगरमधील चाळीत दोन खोल्यांचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची बाब एका नागरिकाने सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनदेखील दिले; मात्र या बांधकामांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

ठाणे महापालिकेत अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात येत असते. अशातच पालिका आयुक्त सौरभ राव यांनीदेखील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानादेखील घोडबंदर भागातील किंगकाँगनगर येथे दोन नवीन खोल्यांचे बांधकाम सुरू आहे. याबाबत अशोक सोनावले यांनी ही बाब सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच एक तक्रार अर्ज दिला होता. त्यावर पालिकेकडून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र तरीही या बांधकामांवर कारवाई केलेली नाही. याच्याविरोधात सोनावले यांनी प्रभाग समितीवर धडक देत, या बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला. तसेच या बांधकामाला स्थानिक माजी नगरसेवकासह सहायक आयुक्तांचा वरदहस्त आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com