खर्डीकरांना''बोहाडा'' यात्रेचे वेध''

खर्डीकरांना''बोहाडा'' यात्रेचे वेध''

खर्डीकरांना ‘बोहाडा’ यात्रेचे वेध
ढोलकाठीचे वाजत-गाजत गावात आगमन
खर्डी, ता. २५ (बातमीदार) : खर्डीच्या सोनाई-सिताई देवी यात्रेचे वेध भाविकांना लागले असून ५ ते १० मेदरम्यान ही यात्रा (बोहाडा) होत आहे. खडींच्या यात्रेला ‘बोहाडा’ असेही म्हणतात. चैत्र शुद्ध पोर्णिमेला देवीच्या काठीचे (ढोलकाठी) गावात आगमन झाले आहे. ढोलकाठीची पूजा करून मिरवणुकीने वाजत-गाजत देवीच्या मंदिरात आणण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गावातील भाविकांनी आपापल्या कुलदैवतांची सोनाई फार्महाऊस येथील आमराईत पूजा करून सामूहिक वनभोजन केले; यावेळी यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन खर्डी देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आले.

सोनाई-सिताई देवीची यात्रा सहा दिवस रात्रभर सुरू असते. यात्रेत पारंपरिक पद्धतीने देवदेवतांची पात्रे नाचविली जातात. ऐन उन्हाळ्यात ही यात्रा होत असून रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीला तसेच यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, खर्डी देवी मंदिर देवालयातर्फे ग्रामपंचायत खर्डी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, महावितरण, ग्रामीण रुग्णालय व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अध्यक्ष गणेश अधिकारी, उत्सव कमिटी अध्यक्ष नरेश अधिकारी, सदस्य विजय बागुल यांनी यात्रेत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

खर्डीच्या सोनाई-सिताई देवीची यात्रा व मुस्लिम बांधवांचा संदल (मिरवणूक) एकाच वेळी आली आहे. यासाठी शहापूरचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डी पोलिस दूरक्षेत्राच्या आवारात देवालय विश्वस्त, शांतता कमिटी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित केल्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील संसारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com