वातावरणात बदलामुळे ठाण्याची हवा शुद्ध

वातावरणात बदलामुळे ठाण्याची हवा शुद्ध

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मागील काही महिन्यांपासून अशुद्ध हवेमुळे बेजार झालेल्या ठाणेकरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. वातावरणातील बदल व उष्णतेत झालेल्या वाढीचा परिणाम हवा प्रदूषणावर झाला आहे. ठाण्यातील हवेच्या प्रदूषणात घट झाली आहे. मागील महिनाभरात ठाणे शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदूषित गटात गणली जात होती. हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका आढळला आहे.

दिवाळीच्या आधीपासून हवेतील गुणवत्ता ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात ठाणे शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो, तसेच महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामेही सुरू आहेत. त्यात वाहतूक कोंडीमुळेही प्रदूषणात वाढ होताना दिसत होती. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे पालिकेने कंबर कसली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनीदेखील प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. विकासकामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, रस्त्यांची धुलाई आदींसह इतर उपाययोजना केल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती; परंतु एप्रिलमध्ये शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे ठाण्याची हवा सध्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. तीन हात नाका, उपवन आणि घोडबंदर भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे. याठिकाणी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे चित्र दिसत आहे.

उपवनची हवा सर्वाधिक शुद्ध
उपवन येथील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक बुधवारी (ता. २४) ७४ इतका आढळला आहे. तर घोडबंदर भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक याच दिवशी ९४ आढळला आहे. त्यातही या तीनही ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक याच महिन्यात १६ तारखेला सरासरी १२३ एवढा आढळून आला आहे; परंतु त्यानंतर हवेचा निर्देशांकात सुधारणा झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com