पनवेल महापालिकेचा दिव्याखाली अंधार

पनवेल महापालिकेचा दिव्याखाली अंधार

पनवेल, ता. २५ (बातमीदार) : सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यास वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, सरकारी वाहनांनीच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल पालिकेच्या मालकीच्या कचरावाहू डम्परवर पनवेल आरटीओने गाडीचे पासिंग न केल्याने दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे पनवेल पालिकेची १४ वाहने असल्याचे मोटर वाहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नियमानुसार सर्व वाहनांना फिटनेस व पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक असताना बहुतांश सरकारी वाहने विनापीयूसी व फिटनेस प्रमाणपत्र नसताना फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती पनवेल पालिका क्षेत्रात निदर्शनास आली. सर्वसामान्यांना दंड करणाऱ्या प्रशासनाकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. सर्वसामान्य वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात असताना महापालिकेसारख्या व्यवस्थापनाने वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व वाहनांना पीयूसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र सक्तीचे असताना पालिकेच्या मालकिची कित्येक वाहने ‘पीयूसी’ फिटनेस प्रमाणपत्राशिवाय फिरत आहेत. एवढेच नव्हे; तर काही वाहनांकडे विमाही नसल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
--------
पालिकेच्या कचरा विभागातील दंड केलेली वाहने पालिकेची असून ती कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला करारावर देण्यात आली आहेत. पालिकेच्या ज्या वाहनांच्या कागदपत्रांची मुदत संपली आहे त्या वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल.
- राजेश डोंगरे, वाहन विभाग, पनवेल महापालिका
-----------
सरकारी वाहनांना वाहतुकीच्या नियमासंदर्भात कागदपत्रांसंदर्भात शिथिलता आहे; परंतु गाडीचे पासिंग अनिवार्य असल्याने पालिकेच्या गाडीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- गजानन ठोंबरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com