Water News: महत्वाची बातमी; बदलापूर, अंबरनाथमध्ये आज पाणीकपात

Water News: महत्वाची बातमी; बदलापूर, अंबरनाथमध्ये आज पाणीकपात

Badlapur news: बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी (ता. २६) नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामासाठी अंदाजे जवळपास आठ ते दहा तासांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी १२ तास अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.ulhas river news

उल्हास नदीवरील बॅरेज येथील जलशुद्धीकरण केंद्रात नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्याचे काम करण्यात येणार असल्याने १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. thane news

तसेच हे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असल्याने शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.( Water shortage today in Badlapur, Ambernath)

गेल्या काही दिवसात बदलापूर शहरातील लोडशेडींग आणि त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यात मागील आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली, विजेची मागणी वाढली होती. परिणामी, वीजवितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याने चक्राकार पद्धतीने भार व्यवस्थापन करण्याची वेळ महावितरणावर आली होती. या आठवड्यात तापमान कमी असल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे.

मात्र गेल्या आठवड्यात वीजपुरवठ्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम दिसून आला. त्यातच आता उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com