मतदान जनजागृतीसाठी स्त्री-शक्ती एकवटणार

मतदान जनजागृतीसाठी स्त्री-शक्ती एकवटणार

पालघर, ता. २५ (बातमीदार) : जिल्ह्यातील मतदारांमध्ये जागृती करून मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी तालुकास्तरावर महिलांची बाईक रॅली ४ मे रोजी काढण्यात येणार आहे. या बाईक रॅलीसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून त्यासाठी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. या लोकशाही उत्सवात महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
ही बाईक रॅली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून काढण्यात येणार असून तिचा समारोप पालघर हुतात्मा चौकात होणार आहे. या राष्ट्रीय कामात सहभागी महिलांना स्वतःची बाईक आणावी लागणार आहे. महिलांनी रॅलीसाठी दिलेल्या लिंकवर आगाऊ नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पदक, प्रमाणपत्र, फेटा आणि नाश्ता देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शुभ्र पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट दिले जाणार आहेत. बाईक रॅली ४ मे रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरू होणार आहे. त्यानंतर पालघर हुतात्मा चौकापर्यंत तीन किलोमीटर ही रॅली चालेल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

सर्व आस्थापनांवरील महिलांना आवाहन
बाईक रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व आस्थापनांवरील महिला अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या विविध महिला अधिकारी, कर्मचारी; तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि पालघर व परिसरातील इच्छुक महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्कृष्ट सादरीकरणासाठी बक्षिसे
बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना पांढरी शुभ्र साडी, वा ड्रेस तत्सम पोशाख आवश्यक आहे. पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान करायचे आहे. रॅलीमध्ये उत्कृष्ट पोशाख व सादरीकरणासाठी बक्षिसे दिली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com