जागतिक हिवताप दिनानिमित्ताने कार्यशाळेचे आयोजन

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने कार्यशाळेचे आयोजन

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने कार्यशाळेचे आयोजन
पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेच्‍या वैद्यकीय आरोग्य विभाग, घनकचरा व स्वच्छता विभागातील अधिकारी उपस्‍थित होते.
यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हिवताप निर्मूलनासाठी स्वच्छता वैद्यकीय विभाग, तसेच घनकचरा व स्वच्छता विभाग या दोन्‍ही विभागांनी एकत्रित मिळून काम करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मिळून व्यवस्थित योजना आखून हिवतापाचे रुग्ण शून्य व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी म्हणाले, हिवतापाच्या उच्चाटनासाठी महापालिकेचे कर्मचारी कायमच प्रयत्न करत असतात. याच्या जोडीला शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्येही हिवतापाबद्दल डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सुचविले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने कीटकजन्य आजाराच्या निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत पथनाट्याच्या माध्यमातून कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले.
....................
हिवताप टाळण्यासाठीचे उपाय
●घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजण, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत.
● परिसरातील डबकी बुजवावीत.
● परिसरातील पाणी वाहते करावे.
● साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत.
● घरातील भंगार सामान, निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी. कुलर व फ्रिजचा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावे.
●शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात.
●शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी, अथवा कापड बांधावे.
●वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.
●ताप आल्यास रक्त नमुने तपासून घ्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com