लोकशाही उत्सवात तरुणाईकडून जागर

लोकशाही उत्सवात तरुणाईकडून जागर

कल्याण, ता. १ (वार्ताहर) : मुस्लिमधर्मीयांची वाढती लोकसंख्या पाहता मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी कल्याणमधील मोहल्यातील सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला आहे. सरकारी यंत्रणा मतदानाबाबत जनजागृती करत आहे; परंतु तरीही अनेक जणांनी मतदान नोंदणीसाठी पाठ फिरवली आहे. अशा वेळी मतदार यादीत नाव नोंदवण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणे आवश्यक आहे. त्याचसाठी कल्याणमधील काही तरुणांनी मतदार जागृती मोहीम राबवत घराघरांत पोहोचून जाऊन ऑनलाईन माध्यमातून नोंदणीही करून घेतली. याद्वारे त्यांनी तब्बल १८ हजार ९७१ मतदारांची नावे नोंदणी करून जनजागृतीचा वसा जोपसला आहे.
संसदीय निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्याची नावे मतदार यादीत नाहीत, अशा नागरिकांची नावे २३ एप्रिलपर्यंत समाविष्ट करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली होती. यात कल्याण येथील मोहल्यातील सुशिक्षित तरुणांनी लोकशाही उत्सवात सहभाग घेण्यासाठी, मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. वकार मोमीन, अख्तर खान, इबाद शिमले, फरदीन पेकर, आमिर खान, रिजवान सय्यद, इम्रान मेमन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रमजानच्या आठव्या उपवासापासून मतदारांची नावे ऑनलाईन नोंदवण्याच्या कामाला सुरुवात केली. सर्वप्रथम कोणतरी (कोनगाव) येथील म्हात्रे कॉम्प्लेक्स आणि ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये नवमतदारांची नावे ऑनलाईन माध्यमातून नोंद केली. त्यानंतर कल्याण आणि आसपासच्या इतर भागांतील मशिदीबाहेर तरावीहीच्या नमाजानंतर मतदार यादीत नावांची नोंदणी सुरू झाली. प्रार्थनेनंतर पूजकांना मतदार ओळखपत्राची माहिती ऑनलाईन कशी भरायची, हे शिकवण्यात आले. काही शालेय विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर या मुलांनी जनजागृतीही केली. तरुणाईच्या पुढाकारामुळे कल्याण शहर आणि परिसरातील २६ ठिकाणी यातील प्रमुख गोविंद वाडी, गफुरडॉन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, दूध नाका, कोनगाव, मासळी बाजार, घास बाजार, जोशीबाग, इंदिरानगर, बल्याणी, मोहना, टिटवाळा आदी परिसरात हेल्प डेस्कद्वारे ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून सुमारे १९ हजार नावे मतदारयादीत नोंदणी केली आहे.


निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीत नाव नसल्याची किंवा त्यांची नावे गायब झाल्याची तक्रार असल्याचे दिसून आले आहे. ही समस्या थोड्याशा प्रयत्नाने सहज सोडवता येऊ शकते. तेथे ‘हेल्प डेस्क’ प्रणाली सुरू करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २६ ठिकाणी टेबल बसवून मतदार यादीत नावांची नोंदणी सुरू केली. नवीन नावाव्यतिरिक्त ज्यांची नावे यादीत आधी होती; पण आता नाहीत, त्यांचीही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली.
- वकार मोमीन, तरुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com