ठाणे पान दोन पट्टा

ठाणे पान दोन पट्टा

संयुक्त जयंतीनिमित्त शाहिरी जलसा कार्यक्रम
कल्याण (वार्ताहर) : किमया योगीधाम येथील वास्तू सिद्धी को-ऑप. हौ. सोसायटीत महापुरुषांची संयुक्त जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी ‘समता कला मंच’च्या कलावंतांनी शाहिरी जलसा सादर केला. चळवळ, श्रमिक-कामगार, क्रांती, महापुरुषांचा पराक्रम आणि संघर्षाच्या शाहिरीने उपस्थितांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारली. यावेळी बौद्धाचारी वामन बोरगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी प्रबोधनपर भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, जिजाऊ, रमाईंबद्दल महत्त्व सांगून प्रबोधन केले. सामाजिक कार्यकर्त्या दीपा गांगुर्डे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते शरद गायकवाड, सुवर्णा साळवे, विपुल मुंबारकर, लक्ष्मण कल्लेडा, सिद्धार्थ सपकाळे आणि प्रेरणा पटेल यांचाही सत्कार करण्यात आला.
......................
चिऊताई फाऊंडेशनच्या वतीने मोफत केक प्रशिक्षण
कल्याण (वार्ताहर) : चिऊताई फाऊंडेशनच्या वतीने मोफत केक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वेश तरे यांनी त्यांची आई अश्विनी तरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिऊताई फाऊंडेशची स्थापना करण्यात आली. मागील तीन वर्षे ‘चिऊताई फाऊंडेशन’ सामाजिक संस्था शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक, साहित्य अन्‌ सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत. कर्गरोगग्रस्तांना मदत, लघुउद्योग शिबिरे, मराठी शाळा- आश्रमशाळांसाठी विविध उपक्रमे चिऊताई फाऊंडेशनच्या वतीने राबविली जातात. अश्विनी तरे या स्वत: यशस्वी उद्योजिका होत्या. त्यांनी केक आणि बेकरी उत्पादनाच्या माध्यमातून अनेक लघुउद्योजिका घडवल्या, ज्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेत त्यांना जिल्हास्तरीय लघुउद्योजिका हिरकणी पुरस्कारदेखील दिला.
..........................
अस्मिता येंडे यांना ‘भाषा संवर्धक पुरस्कार’
ठाणे (बातमीदार) : मराठी भाषेचे संवर्धन तसेच मराठी शुद्धलेखन व व्याकरणाविषयी सातत्याने जनजागृती करणाऱ्या भाषाशास्र अभ्यासक अस्मिता येंडे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या वतीने ‘भाषा संवर्धक पुरस्कार’ अभिनेते भूषण तेलंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एम.एच. हायस्कूलमध्ये हा सोहळा पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य, उपाध्यक्ष विनोद पितळे, कार्यवाह मनीष वाघ, साधना ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अस्मिता यांनी २०० हून अधिक पुस्तकांची परीक्षणे लिहिली असून वाचनसंस्कृती जपण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. मराठी भाषेचा गौरव हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो ३६५ दिवस साजरा व्हायला हवा, या उद्देशाने मराठी शुद्धलेखनाविषयी असलेली उदासीनता दूर करण्यासाठी त्या सलग आठ महिने समाजमाध्यमावर मराठी शुद्धलेखन उपक्रम राबवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com