विमा योजना, जोडधंद्याला प्राधान्य आवश्यक

विमा योजना, जोडधंद्याला प्राधान्य आवश्यक

वसई, ता. २९ (बातमीदार) : वृत्तपत्र हा समाजाचा आरसा आहे. वृत्तपत्र विक्रेते श्वास आहेत. उन्हातान्हात, पावसात, थंडीत कुडकुडत वाचकांची वाचनाची तहान भागवण्यासाठी धडपड करतात. समाज घडामोडी पोहचवत काम करत असतात; मात्र त्यांना अनेक समस्या भेडसावत असतात. त्यांच्या कुटुंबीयांसाठी विमा, हक्काचे स्टॉल, जोडधंदा, नवी योजना; तसेच ठोस उपाययोजनांची धोरण आखावे; जेणेकरून वाचनसंस्कृतीला वाव देण्यासाठी मिळेल. वृत्तपत्र चालकांच्या व्यवसायाला देखील चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते आहेत. रात्री ३ वाजता उठून ते वृत्तपत्र जमा करतात. नागरिकांच्या घरोघरी पोहचवत असतात. विविध भागात स्टॉलवर विक्री करतात. त्यांच्यामागे अपार मेहनत असते. त्यामुळे त्यांना ठोस अशी कमाईची हमी सरकारकडून मिळावी. आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबीयांना विमा कवच असावे, यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी धोरण आखले जावे. जेणेकरून महागड्या आजारापासून त्यांचे संरक्षण होईल. याचबरोबर वाचन संस्कृतीला वाव मिळावा, जेणेकरून वाचकांची संख्या वाढेल. वृत्तपत्र विक्रीतून कामाचे साधन प्राप्त होईल आणि समाजात बदलही घडण्यास हातभार लागेल, या अपेक्षा आगामी सरकारकडून अपेक्षित आहेत.
-------------------------
सध्या वाचन कमी झाल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे वाचन वाढावे, यासाठी आगामी सरकारने काही योजना, प्रोत्साहनपर चळवळ उभी केली पाहिजे; तसेच अनेक वृत्तपत्र चालक हे समाज घडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे नव्या योजना, वृत्तपत्रासोबत जोडधंद्याला वाव देऊन वृत्तपत्रचालकांना व्यवसायासाठी मदत करावी. आर्थिक दुर्बल घटकांकडे लक्ष द्यावे. गोरगरिबांकडे लक्ष द्यावे.
- सतीश जोशी, निर्मळ

गेली ५९ वर्षे वृत्तपत्र व्यवसाय करत आहे. सद्यस्थितीत नागरिकांचा कल कमी होत आहे; मात्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून वाचक वाढेल. वृत्तपत्रविक्रेत्यांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. जे २५ ते ३० वर्षे वृत्तपत्रविक्रेते म्हणून काम करत आहेत. अशांना नवी योजना आखावी. राखीव निधी द्यावा. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होईल. कोरोनाकाळात वृत्तपत्र व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली. जर नव्या योजना मिळाल्या, तर अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. यासाठी आगामी सरकारने विचार करावा.
- शशिकांत (बाबू) धोंडे
---------------------
वाचक संख्या वाढवण्यासाठी आगामी सरकारने नवी सुधारणा केली पाहिजे. वाचनसंस्कृतीला शहरी आणि ग्रामीण भागात वाव द्यावा. वृत्तपत्रविक्रेत्यांना कायमस्वरूपी हक्काची जागा मिळावी. विमा योजना असावी. उदरनिर्वाह अन्य साधन नसल्याने ठोस कमाईसाठी धोरण अवलंबवावे; जेणेकरून वृत्तपत्रविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- शैलेश जनार्दन घारपुरे, कासा, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com