महिन्याभरात मतदारांत १५ हजारांनी वाढ

महिन्याभरात मतदारांत १५ हजारांनी वाढ

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या महिन्याभरात १५ हजारांहून अधिक वाढली आहे. या मतदारसंघातील मतदारांची अंतिम संख्या आता चार लाख ५४ हजार ६९६ एवढी झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अधिसूचना जाहीर होईपर्यंत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचे काम सुरू ठेवले होते. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्याची अधिसूचना जाहीर होईपर्यंतच्या मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात १५ हजार ४१३ मतदार वाढले आहेत.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर मिरा भाईंदर विधानसभा निवडणूक कार्यालयाकडून मतदारसंघाची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्या वेळी एकंदर चार लाख ३९ हजार २८३ मतदार होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची अधिसूचना जाहीर होईपर्यंत मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपली नावे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्या‍नंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी मतदारांकडून अर्ज भरून घेतले. या महिन्याभरात १५ हजार ४१३ मतदार वाढले आहेत. आता एकूण मतदारांची संख्या आता चाल लाख ५४ हजार ६९६ एवढी झाली आहे. त्यात पुरुष दोन लाख ४१ हजार ६३८, महिला दोन लाख १३ हजार ५४, तृतीयपंथी मतदारांची संख्या चार; तर पहिल्यांदाच मतदान करणारे चार हजार ९८६ आणि ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या पाच हजार ०५९ एवढी आहे.

४५१ मतदान केंद्रे
मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदर ४५१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील पक्क्या इमारतीतील मतदान केंद्रांची संख्या २५७ आहे. तर पार्टीशन करून बनवण्यात आलेल्या मतदान केंद्रांची संख्या १६१ आणि मंडपांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३३ एवढी आहे. या मतदारसंघासाठी एकंदर २१६५ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com