क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपयांची फसवणूक

क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपयांची फसवणूक

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : क्रेडिट कार्डचे व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी कार्डाची माहिती मागवून एका महिलेची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना भाईंदर पूर्व येथे घडली. पोलिसांच्या सायबर विभागाने त्वरेने पावले टाकत यातील बहुतांश रक्कम महिलेला परत मिळवून दिली आहे.

नवघर पोलिस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेला अनोळखी व्यक्तीने फोन करून क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने क्रेडिट कार्डचे व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महिलेकडून कार्डाचे तपशील मागितले. त्यानुसार महिलेने आपल्या कार्डचे तपशील संबंधित व्यक्तीला दिले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून दोन लाख सहा हजार १५३ रुपये वजा झाले असल्याचा संदेश त्यांना आला. त्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायबर पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांच्या पथकाने झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम ज्या मर्चंट अकाऊंटवर जमा झाली होती, त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला व फसवणूक झालेली रक्कम थांबविण्यात आली. त्यानंतर त्यातील एक लाख ८७ हजार २०६ रुपये महिलेच्या मूळ खात्यात पुन्हा जमा करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com