मतदान केंद्रांवर आरोग्याचे बूस्टर

मतदान केंद्रांवर आरोग्याचे बूस्टर

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २९ : सद्यस्थितीत तापमानात अधिक वाढ झाली आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी बसणार आहे. अशातच पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या २० मे रोजी होणार आहे. या दिवशी नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणार असून, त्यांना आरोग्याची समस्या जाणवू नये यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेतली आहे. यासाठी एकूण दोन हजार २६३ मतदान केंद्रांवर आरोग्याच्या दृष्टीने लक्ष दिले जाणार आहे.

पालघर मतदारसंघात मतदान करताना नागरिकांच्या रांगा लागणार आहेत. या वेळी उष्णतेची झळ निर्माण होऊन भोवळ येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा अन्य आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. ज्या मतदारांना आरोग्यविषयक आजार आहेत. त्यांनाही त्रास होऊ शकतो. याचा सारासार विचार निवडणूक आयोगाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्रथमोचार पेटीची यादी देण्यात आली. त्यानुसार आरोग्य विभागाने ती सादर केली असून त्यात विविध औषधे, पाण्याचे प्रमाण संतुलित राहावे, यासाठी घटकांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------

प्रथमोपचार पेटीची सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रात प्रथमोचार पेटी असणार आहे. त्यामध्ये ओआरएस पावडर, ग्लुकोन-डी, पॅरासिटामॉल गोळी; तसेच अन्य औषधांचा समावेश असणार आहे. उष्णतेचा दाह अधिक जाणवला, तर त्वरित उपचार घेणे मतदाराला सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ही व्यवस्था निवडणूक आयोग व जिल्हा आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे.

लहान मुलांसाठी पाळणाघर
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबवली जात असताना तान्हे बाळ घेऊन येणाऱ्या महिलांना सुविधा देण्यात येणार आहे. मतदान करेपर्यंत लहान मुलांसाठी पाळणाघर संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी अंगणवाडीसेविका मुलांची काळजी घेणार आहेत.
------------------
मदत केंद्र, रुग्णवाहिका
प्रत्येक तालुक्यानुसार मदत केंद्र असणार आहे. यावर आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक लक्ष देणार आहेत. रुग्णवाहिका, चालक आणि मदतनीसांचे क्रमांकही मतदान केंद्रात लावण्यात येणार आहेत. जेणेकरून त्वरित आरोग्य सेवा मिळू शकेल, हा हेतू असणार आहे.
------------------
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. उष्णतेपासून मतदारांचा बचाव करण्यासाठी प्रथमोपचार पेटी निवडणूक विभागाकडून प्रत्येक मतदान केंद्रात ठेवण्यात येणार आहे; तसेच रुग्णवाहिकाही सज्ज असेल.
- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com