लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका २६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला आहे. रिया राजगोर असे मृत तरुणीचे नाव आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे.
डोंबिवली पूर्वेला राहणारी रिया ही ठाणे येथे कामाला होती. नेहमीप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वेस्थानकातून मुंबई दिशेला जाणारी जलद लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने दरवाजाजवळ ती उभी होती. रेटारेटीमुळे कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान रियाचा तोल जाऊन ती रुळांवर पडली. सोमवारी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान हा अपघात घडला असून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना घटनास्थळी रियाचा मृतदेह सापडला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच लोकल कर्जत-कसाराहून भरून येतात. डोंबिवली स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये शिरण्यासासाठी जागा मिळत नाही. अनेक प्रवासी जोखीम पत्करतात लोकल दरवाजाला लटकून प्रवास करतात. त्यामधून असे अपघात घडत आहेत. त्यामुळेडोंबिवली-सीएसएमटी लोकलमध्ये वाढ करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला होता. राज्य शासनाने त्याला प्रतिसाद दिला नाही. आणखी किती प्रवाशांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार आहे? रेल्वेनेही गर्दीच्या वेळी लोकलचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून असे अपघात घडणार नाहीत, असे उपनगरी प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.
----------------------------------
आठवडाभरातील दुसरी घटना
डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू होण्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी अवधेश दुबे याचाही २३ एप्रिलला लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन डोंबिवली ते मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान मृत्यू झाला होता.
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com