चेंबुरच्या‘शंकरालयम’मध्ये महाकुंभाभिषेकम सोहळा

चेंबुरच्या‘शंकरालयम’मध्ये महाकुंभाभिषेकम सोहळा

मुंबई, ता. २९ (प्रतिनिधी)ः प्रती शबरीमाला समजल्या जाणाऱ्या मुंबईतील ‘शंकरालयम’ येथे १ मे रोजी आद्य जगद्गुरू बदरी शंकराचार्य यांच्या हस्ते महाकुंभाभिषेकम सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतल्या चेंबूरमधील चार मजली शंकरालयम मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ज्या भाविकांना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला देवस्थानाला जाणे शक्य होत नाही. ते भाविक चेंबूरच्या ‘शंकरालया’ला भेट देतात. अय्यपाच्या मूर्तीला दर १२ वर्षांनंतर उर्जावान करावी लागते. त्यामुळे २००२ आणि २०१४ मध्ये शंकरालयम येथे महाकुंभाभिषेकम सोहळा केला जातो. यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष असून देशभरातील विविध मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यात देशाचे अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी, त्रावणकोर राजघराण्याच्या युवराज्ञी आणि तिरुवनंतपुरमची महाराणी थंब्रत्ती, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी, देशाचे शास्त्रीय सल्लागार डॉ. आर चिंदबरम, महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
--------------------------------------------
चार मजली भव्य इमारत
चेंबूरमध्ये २००२ मध्ये चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना करण्यात आली. या मंदिरात धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास असल्याचे मानले जाते. संस्थेकडून वर्षभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. मंदिरातील तळ मजल्यावर सहा हजार चौरस फुटांचे सभागृह भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग अशा विविध कार्यक्रम होतात. तसेच अन्य मजल्यांचा वापर सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना, धर्मादाय, धार्मिक कार्यक्रमासांठी केला जातो.
-----------------------------------------------------
महाकुंभाभिषेकम हा महत्त्वाचा सोहळा आहे. जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती लावत सोहळ्याचा आनंद घ्यावा.
- जयंत लापसिया, अध्यक्ष, शंकरालयम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com