क्षुल्लक कारणावरून मुलुंडमध्ये खून

क्षुल्लक कारणावरून मुलुंडमध्ये खून

क्षुल्लक कारणावरून मुलुंडमध्ये खून
पाच आरोपींना अटक

घाटकोपर, ता. २९ (बातमीदार) ः मुलुंडमधील चिकन शॉपमधून विकत घेतलेल्या चिकन तंदुरीचे पैसे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा धारदार चाकूने खून करण्यात आला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री घडली.
अक्षय नार्वेकर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून आकाश साबळे (वय ३०) जखमी आहे. आरोपींविरुद्ध मुलुंड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. इम्रान महमूद खान (वय २७), सलीम महमूद खान (वय २९), फारुख गफार बागवान (वय ३८), नौशाद अली गफार बागवान (वय ३५), अब्दुल गफार बागवान (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, आरोपी इम्रान खान व सलीम खान यांच्या सांगण्यावरून अक्षय व आकाश चिकन सेंटरवर रात्रीच्या सुमारास आले होते. अब्दुल याने चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केले. तसेच आरोपी फारुख व नौशाद अली यांनी लोखंडी रॉडने अक्षयच्या डोक्यात घाव घालून त्यास गंभीर जखमी केले. दोन्ही जखमींना ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी अक्षय यास तपासून मृत घोषित केले. आकाशवर उपचार सुरू केले. पाचही आरोपींना मुलुंड पोलिसांनी लागलीच अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com