ठाण्याची जागा भाजपलाच हवी

ठाण्याची जागा भाजपलाच हवी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करून सोमवारी (ता. २९) नामनिर्देशन अर्जही दाखल करण्यात आला आहे. असे असताना महायुतीत मात्र उमेदवारीवरून अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच भाजपची स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे ठाण्याची जागा भाजपलाच हवी, अशी मागणी करू लागले आहेत. दोन दिवस झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकीतही मागणी लावून धरण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या दिवसापासूनच ठाणे लोकसभेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. आता नामनिर्देश दाखल करण्याची वेळ आली, तरी महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे कार्यकत्यांची चलबिचल सुरू झाली आहे. अशातच रविवारी भाजपच्या कार्यालयात ‘मेरा बुथ सब से मजबुत’ अंतर्गत बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांनी हजेरी लावली होती. त्या‍वेळी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना ठाणे लोकसभा लढवण्याचा हट्टच धरला. त्यानंतर सोमवारी (ता. २९) सकाळी ७.३० वाजता बुथ लेव्हलच्या पदाधिकारी, माजी नगरेसवक व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झाली. या बैठकीतही ठाणे लोकसभा भाजपने लढावी, अशी मागणी लावून धरल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. या वेळी ठाणे लोकसभा भाजपला का हवी? यासाठी इतिहासाचे दाखलेही या वेळी चव्हाण यांच्या समोर मांडण्यात आले. मैत्रीत ठाणे आणि पालघर लोकसभा हा शिंदे सेनेकडे गेला आहे; परंतु जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून, हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. असे असले तरी, वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार कोणी असला, तरी महायुतीसाठी काम करायचे आहे. त्या दृष्टीने तयार राहा, अशी सूचना करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com