‘हार्बर’वर लोकल घसरली

‘हार्बर’वर लोकल घसरली

‘हार्बर’वर लोकल घसरली
गाड्या तीन तास ठप्प; प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : आठवड्याच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा एक डबा रेल्वे रुळांवरून घसरल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र तब्बल तीन तास हार्बर मार्गावरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील ८२पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द, तर अनेक लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून लोकल सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही लोकल सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा एकामागे एक उभ्या होत्या. लोकलमध्ये प्रवासी अडकून पडल्याने अनेकांनी खाली उड्या मारून रेल्वे रुळांवरून पायपीट करून नजीकचे स्थानक गाठले. या घटनेची माहिती मध्य रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचे चाक पुन्हा रेल्वे रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. यादरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मशीद बंदर स्थानकापर्यंत आणल्या जात होत्या. त्यानंतर अनेक लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीच्या प्रवासासाठी पनवेल, बेलापूर मार्गस्थ करण्यात आल्या.
...
दुपारी ३.०६ वाजता लोकल सुरू
मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने सकाळी ११.४५ वाजता घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम वेगात सुरू केले. दुपारी १.१५ मिनिटांनी घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यात आला. त्यानंतर अपघातग्रस्त लोकल एक वाजून ५५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर रेल्वे रूळ लोकल धावण्यासाठी सज्ज आहे की नाही याची शहानिशा झाल्यानंतर दुपारी ३.०६ वाजता सीएसएमटीहून बेलापूरसाठी पहिली ट्रेन रवाना करण्यात आली.
...
८० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द
या घटनेमुळे सोमवारी सायंकाळी सहा वाजून १६ मिनिटांपर्यंत हार्बर मार्गावरील ५२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर २६ लोकल फेऱ्या वडाळा स्थानकांत थांबवण्यात आल्या. याशिवाय वडाळा ते पनवेल- बेलापूर धावणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. पनवेलहून वडाळा दिशेने जाणाऱ्या लोकलदेखील १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत हार्बर मार्गावरील ८०पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com