मुंबईत अर्ज भरण्याची लगबग

मुंबईत अर्ज भरण्याची लगबग

अर्ज भरण्याची लगबग सुरू
राहुल शेवाळे, अनिल देसाई, अरविंद सावंत यांचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २९ : राज्यात झालेला सत्तासंघर्ष आणि अनेक नव्या राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. मुंबईत तीन मतदारसंघांत शिवसेना दोन गट आमनेसामने येणार आहेत. त्यापैकी दक्षिण मध्य मतदारसंघातून राहुल शेवाळे (शिंदे गट) आणि अनिल देसाई (उद्धव ठाकरे गट) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले, तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांनी अर्ज भरला.
याशिवाय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद माहताब अख्तर हुस्सेन शेख (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. मयुरी संतोष शिंदे (अपक्ष), सबिहा बानो (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आज एकाच वेळी शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षांतील उमेदवार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करत असताना सीएसएमटी परिसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अर्ज भरण्यापूर्वी श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. राहुल शेवाळे यांनी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन वंदन केले. दादरच्या चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
...
‘मुंबई उत्तर-पूर्व’तून दोन अर्ज दाखल
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केला. मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), बबन सोपान ठोके (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून रोहन रामदास साठोणे (अपक्ष) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com