गणेश मूर्तीकारांना नि:शुल्क माती, जागा

गणेश मूर्तीकारांना नि:शुल्क माती, जागा

गणेश मूर्तिकारांना नि:शुल्क माती, जागा
परवानग्यांकरिता एक खिडकी योजना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मूर्तिकारांसाठी एक खिडकी योजनादेखील राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मूर्तिकारांसाठी पालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली. मूर्तिकार मंडप परवानगीची कार्यवाही विभागस्तरावर एक खिडकी योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी मंडपासाठी अर्ज सादर करताना गेल्या सलग तीन वर्षांच्या परवानग्यांच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच मंडपासाठी परवानगी देण्यात येईल. मूर्तिकारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ज्यांच्याकडे सलग तीन वर्षांच्या परवानग्या असतील त्यांना यंदा नव्याने स्थानिक पोलिस व वाहतूक विभाग यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. सार्वजनिक जागेवर मूर्तिकारांकडून मंडपासाठी नव्याने अर्ज आल्यास विभागीय कार्यालयाकडून त्याबाबत तपासणी करण्यात येईल. तसेच मूर्तिकारांना आवश्यकतेनुसार मंडप उभारणीसाठी दिलेली परवानगी नवरात्री उत्सवापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
...
मंडपांसाठी शुल्क नसेल
पालिकेच्या मालकीच्या जागेवरील मंडपासाठी, खासगी जमीन मालकाच्या परवानगीने उभारावयाच्या मंडपासाठी यंदा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्रत्येक मंडपासाठीही अनामत रक्कम आकारली जाणार नाही. यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे अनिवार्य आहे. तसेच सदर जागेवर मूर्तिकारांना सोयी-सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
...तर आकारणार दंड
मूर्तिकारांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते, पदपथावर खड्डे खणल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मूर्तिकारांसाठी मंडपाची परवानगी देताना ती परवानगी केवळ मूर्तिकारांसाठी असेल व परवानगीचा उपयोग मूर्ती विक्रीकरिता केला जाणार नाही, असे स्वयंघोषित हमीपत्र मूर्तिकारांना महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com