वाहतूक पोलिसांना संवादाचे धडे

वाहतूक पोलिसांना संवादाचे धडे

ठाणे, ता. २९ (वार्ताहर) : तणावाखाली असलेल्या वाहतूक पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधताना कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, यासाठी तीन दिवसीय संवाद कौशल्याच्या कार्यशाळेचे उद्‌घाटन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारी (ता. २९) झालेल्या या उपक्रमात वाहतूक पोलिस दलातील शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
संवाद कौशल्य ही काळाची गरज आहे. पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदारापेक्षा जास्त पटीने संपर्क हा वाहतूक पोलिसांशी नागरिकांचा सर्वाधिक संपर्क होत असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जागरूक राहून नागरिकांशी विनम्र संवाद साधावा, यासाठी ठाणे पोलिसांकडून विशेष संवाद कौशल्य कार्यशाळा भरवण्यात आली होती. यावेळी कारवाई करतानाही वाहतूक पोलिसांनी नागरिकांशी संयमाने संवाद साधावा. तसेच पोलिसांची प्रतिमा डागाळणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला. तर सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी लोकांशी संवाद साधताना विनम्रता ठेवा, कर्तव्य बजावत असताना पोलिसही तणावात असतात, तर नागरिकही तणावात असतात, तेव्हा याठिकाणी विनम्र संवाद कौशल्याचा मोठा उपयोग करता येऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी वाहतूक पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
-------------------------------------------------
संवाद कौशल्याची कार्यशाळा हा उपक्रम पुढील काळातही राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून ३०० वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचे संवाद कौशल्य सुधारणार आहोत. ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून हे धडे देण्यात येणार आहेत.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपआयुक्त ठाणे वाहतूक विभाग
--------------------------------------------
काय बोलावे अन्‌ काय टाळावे, कार्यशाळेच्या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडीओतून वाहतूक पोलिसांना कौशल्याच्या सकारात्मक परिणामाची जाणीव करून देण्यात येत आहे. संयम, विनम्रपणे संवाद साधल्यास तणावाखाली होणाऱ्या अप्रिय घटना टाळता येतील.
-सानिका कुलकर्णी, निवेदिका-पोलिस प्रशिक्षिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com