गोवंडीत प्रचारादरम्यान दगडफेक

गोवंडीत प्रचारादरम्यान दगडफेक

चेंबूर, ता.२९ (बातमीदार) ः भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास दगडफेकीची घटना
घडली आहे. याप्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची प्रचार यात्रा मानखुर्द गोवंडी विभागात काढण्यात आली होती. प्रचाराचा रथ देवनार येथील गौतम नगर परिसरातील वामन दादा कर्डक चौकाजवळ आला असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात एक महिला जखमी झाली आहे. विरोधकांकडून ही दगडफेक झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com