const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
सह्याद्रीच्या अभेद्य कवचामुळेच पर्यावरणाची जपणूक : रविंद्र प्रभुदेसाई

सह्याद्रीच्या अभेद्य कवचामुळेच पर्यावरणाची जपणूक : रविंद्र प्रभुदेसाई

ठाणे, ता. १ (बातमीदार) : सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्ग संपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. अशा सह्याद्रीचे विलक्षण आकर्षण माझ्यासह प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या चार मित्रांसह ४० वर्षांपूर्वी केलेली सह्याद्री पदभ्रमणाची पुस्तकरूपात प्रकाशित होत असलेली मोहीम सह्याद्रीच्या अंतरंगाची अधिक माहिती करून देणारी व त्याच्याविषयीची ओढ अधिकच वाढवणारी आहे, असे मत उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकरलिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा’ हा पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी (ता. २८) रोजी पार पडला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रवींद्र प्रभुदेसाई बोलत होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर, आनंद विश्व गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखणीतील सातत्य हे टेटविलकरांचे वैशिष्ट्य असून त्यांची १३ पुस्तके इतिहासाच्या अनेक दुर्लक्षित घटकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात, असे सांगत रवींद्र प्रभुदेसाई यांनी विविध उत्पादनांतून पितांबरी उद्योगसमूह कार्यरत असताना त्यात सेवाभावी दृष्टिकोन जपण्यामुळे समाजाचे ऋणमुक्त होण्याचे समाधान लाभते, असे मत मांडले.

भटक्यांसाठी मार्गदर्शक
विक्रमवीर गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य कर्तृत्व गाजविणारे सदाशिव टेटविलकरांचे व्यक्तिमत्त्व आम्हा दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सह्याद्रीची परिक्रमा हे त्यांचे पुस्तक भटक्यांना मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com