तिहेरी अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

तिहेरी अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

मनोर, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नादुरुस्त कंटेनरला ट्रक आणि टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. मुबिन अहमद (वय ४३) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी झालेल्या तिहेरी अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आवंढाणी गावात कंटेनर नादुरुस्त झाल्याने मुंबई वाहिनीच्या पहिल्या मार्गिकेवर उभा होता. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव वेगातील ट्रकने नादुरुस्त कंटेनरला धडक दिली. तर ट्रकच्या पाठीमागून येत असलेला टेम्पो ट्रकला धडकून तिहेरी अपघात झाला. महामार्गावर व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे. या कामादरम्यान कंत्राटदाराकडून वाहनचालकांची सुरक्षा आणि पर्यायी वाहतुकीसाठी उपाययोजना करण्यात न आल्याने महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नादुरुस्त वाहने हटवण्याच्या कामात हयगय केली जाते. त्यामुळे महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेल्या वाहनांना धडकून अपघातांची संख्या वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com