सूर्याचा प्रकोप

सूर्याचा प्रकोप

पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल शहरासह वसाहतींमधून सर्वत्रच सकाळी नऊपासून उन्हाचा तडाखा सुरू होत असून, पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे. दिवसभर चढते उन्ह असल्याने कष्टकरी मजुरांसह शहरातील इतरत्र कष्टाची कामे करणारे नागरिक व दुकानात काम करणारे कामगार तसेच
घरात बसून असणारे नागरिकही हैराण झाले आहेत. नवी मुंबईतही रस्त्यांवर व दुकानांमध्ये शुकशुकाट पसरला असून घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. छत्री, स्कार्फच्या वापरासह थंडपेयांकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
उन्हाच्या या काहिलीत झाडांचे महत्त्वदेखील आता लक्षात येऊ लागले आहे. मात्र, झाडे लावण्याची आणि जोपासण्याची तसदी पालिकेसह फारशी कोणी घेताना दिसत नाही. त्यामुळे हा उन्हाळा सगळ्यांचाच घाम काढताना दिसत आहे. पनवेलमधून विविध ठिकाणी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते वृक्षारोपण करतानाचा फोटो काढणेही अलीकडच्या काळातील केवळ फॅशन बनली असून, लावलेल्या झाडांची देखभाल व जोपासना करताना तितकेसे कोणी मनावर घेताना दिसत नाही. उन्हाळ्यात शारीरिक श्रम, मेहनतीची व मजुरीची कामे फार वेळ केल्याने उष्माघात होतो. जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर केल्यानेही ही परिस्थिती ओढावते. सध्या शहरामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून, उष्माघात होण्याची शक्यता आहे.
पनवेल, उरण तसेच नवी मुंबई परिसरातील बँका, खासगी कार्यालये, दुकानांमध्ये दिवसभर शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे. नागरिकांनी सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या सुमारासच घराबाहेर पडून कामे उरकली जात आहेत. स्कार्फ, टोपी, गॉगल, पाण्याची बाटलीसह शीतपेयांचा वापर वाढला आहे. त्यातच एखाद्या वेळी वीज खंडित झाल्यास पंखे व एसीअभावी जीव हैराण होत आहे. रस्त्यावरून उष्णतेच्या वाफा येत असल्याचा भास होत असून चेहऱ्याला उन्हाचे चटके बसत आहेत.
------------
नागरिकांनी वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावीत, शक्य असल्यास थोडा वेळ सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत, उष्णता शोषून घेणारे काळ्या व गडद रंगाचे, तंग कपड्यांचा वापर टाळावा, सैल पांढरे अथवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत.
- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल
-------
यांनी घ्यावी जास्त काळजी
गर्भवती महिला, बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणारी व्यक्ती, वयस्कर, वृद्ध, ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, डायबेटीस आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. हृदयरोग, फुप्फुसाचे विकार किंवा मूडपिंड, यकृताचे आजार, आजारी असणाऱ्या व्यक्तींनी उन्हामध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

------
बाजारपेठा ओस
कडक उन्हाच्या काहिलीने सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारपेठेसह गावच्या मुख्य रस्त्यावरसुद्धा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ऐन यात्रा-जत्रा व लग्नसराईच्या काळात ग्राहक दुकानाकडेसुद्धा फिरकत नाहीत. तीव्र उन्हाचा विपरीत परिणाम व्यापारी बाजारपेठेसह ग्रामीण भागातीलही अर्थकारणावर झालेला दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com