रस्ता ओलांडताना वृद्धाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना वृद्धाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना वृद्धाचा मृत्यू
पिवळा बंगला थांब्‍यावर अपघात वाढले
धारावी, ता. ३० (बातमीदार) : धारावीतील पिवळा बंगला येथे रस्‍ता ओलांडताना सोमवारी सायंकळी धारावीतील दगडी बिल्डींग येथील रहिवासी तुकाराम व्हटकर (७६) यांचे निधन झाले. यामुळे धारावीत संताप व्यक्त केला जात आहे.
पादचाऱ्यांना येथे दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे सतत अपघात घडत असतात. धारावीतून माहीम, दादर, वांद्रे, बोरिवलीच्या दिशेला जाण्यासाठी तसेच शीव, चेंबूर, मुलुंड, कुलाबा येथे जाण्या-येण्यासाठी बेस्टने ‘पिवळा बंगला’ व ‘धारावी कोळीवाडा’ नावाने बस थांबे प्रवाशांच्या सोयीसाठी बनवले आहेत.
या बसथांब्याहून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. विद्यार्थी, रुग्ण, ज्‍येष्ठ नागरिक, गरोदर महिला आदी प्रवासी येथून प्रवास करतात. वांद्रे, माहीम आदी ठिकाणाहून धारावीत येणाऱ्या प्रवाशांना व दादर, कुलाबा, मुलुंड आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना येथील रस्ता ओलांडून यावे-जावे लागते. हा द्रुतगती मार्ग असल्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते.
रहिवाशांना दुसरा पर्याय नसल्यामुळे नाईलाजाने वाहनांसमोरून रस्ता ओलांडावा लागत आहे. मुलाकडे वाशी नाका येथे निघालेले व्हटकर बसथांब्याकडे जात होते. तेव्हा दुचाकीस्वाराने त्‍यांना धडक दिली. सायन रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे.

पादचारी पूल बनवा
अनेकदा रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचे अपघात झाले आहेत. अनेकांचे जीवसुद्धा गेले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झालेले आहेत. जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडावा लागत असल्यामुळे पादचारी नाराजी व्यक्त करीत आहेत. शासनाने रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल बनवण्याची मागणी होत आहे. रस्त्यावर तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी मनसेचे कार्यकर्ते संदीप कदम यांनी केली आहे. त्‍यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com