उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
Published on: 

उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
पियूष गोयल, वर्षा गायकवाड, संजय पाटील यांचे अर्ज दाखल


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ‘मविआ’च्या वर्षा गायकवाड यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर ईशान्य मुंबईतून मविआचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळी येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियूष गोयल यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

वर्षा गायकवाड यांनी वांद्रे पश्चिम येथील खेरवाडी जंक्शन येथून महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित भव्य रॅलीला काढत आपला अर्ज सादर केला. यावेळी बोलताना उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीला नक्की विजय मिळेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी माजी खासदार प्रिया दत्त, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब, माजी मंत्री अस्लम शेख आदी नेते उपस्थित होते. दुसरीकडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज विक्रोळी येथील निवडणूक कार्यालयात दाखल केला. महाविकास आघाडीसाठी राज्यात वातावरण चांगले असून आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून येतील, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. ठाकरे यावेळी म्हणाले की, देशात लोकशाही धोक्यात आहे. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा, आमदार सुनील राऊत, काँग्रेसचे वीरेंद्र बक्षी, रिपब्लिकन पक्षाचे नेते दीपक निकाळजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, शिवसेना उपनेते सचिन अहिर, माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेना आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, तसेच विभागप्रमुख सुरेश पाटील उपस्थित होते.

...
नाराज नेत्यांची दांडी
उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार नसीम खान, आमदार भाई जगताप आदी इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी वर्षा गायकवाड यांचा अर्ज भरण्यास दांडी मारली. यावरून त्यांची नाराजी कायम असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

udaysinh patil undalkar
Satara District Bank Election Mahayuti Leaders File Nominations As 74 Candidates Enter The Electoral Contest
Gopichand Padalkar sangli jilha bank
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com