मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन

मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई ते नागपूरदरम्यान रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने गुरुवार, २ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूरदरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२१०३ अतिजलद एकेरी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ मे रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूर येथे पोहचेल. ही एकेरी स्पेशल ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबणार आहे. या एकेरी विशेष ट्रेनचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर १ मे सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com