मुंबईत वीज कडाडली!

मुंबईत वीज कडाडली!

विजेची रेकॉर्डब्रेक मागणी, ३९८९ मेगावॉटचा टप्पा गाठला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : चढलेला तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे आज मुंबईत आतापर्यंतची विजेची रेकॉर्डब्रेक मागणी नोंदली आहे. तब्बल तीन हजार ९८९ मेगावॉटचा टप्पा गाठला असून मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांनी मिळून सदरची मागणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तर मुंबईसह राज्याची विजेची मागणी २८ हजार ९६४ मेगावॉटवर गेली होती.
तापमान वाढल्याने मुंबईकरांकडून एसी, पंखे, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सकाळपासूनच विजेच्या मागणीचा चढता आलेख दिसून येत आहे. दुपारी ३.१५ मिनिटांनी सुमारे पंधरा मिनिटांसाठी मुंबईची विजेची मागणी ३,९८९ मेगावॉट एवढी होती. त्यानंतर ३.३० वाजता ३,९४५ पर्यंत खाली आली. दरम्यान, ३० मे २०२३ रोजी मुंबईत ३,९६८ मेगावॉट एवढी सर्वाधिक मागणी नोंदली होती. त्याचा रेकॉर्ड आज मोडला आहे. आजची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या वीज केंद्रातून १२६५ मेगावॉट, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज केंद्रातून ५०३ मेगावॉट वीज घेतली तर २,२०७ मेगावॉट पॉवर एक्सचेंजमधून घेतली आहे.
राज्यभरातून आज महावितरणकडे २४ हजार ९६७ मेगावॉट एवढी विजेची मागणी नोंदली होती. ती पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून आठ हजार ९५७ मेगावॉट, खासगी वीज प्रकल्पातून सात हजार ९०४ मेगावॉट, तर एक्सचेंजमधून सुमारे आठ हजार १५० मेगावॉट वीज घेतली आहे.

वाढ अशी
वेळ आणि मागणी (मेगावॉटमध्ये)
- सकाळी ०९.४० वाजता - ३,४२३ मेगावॅट
- सकाळी १०.००- ३,५१०
- दुपारी ०१.२०- ३,७९८
- दुपारी ०३.०० - ३,९४३
- दुपारी ०३.१५- ३,९८०
- दुपारी ०३.३० - ३,९४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com