सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनकर ठाकरे

सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनकर ठाकरे

पडघा, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनकर ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
मावळते सरपंच उत्तम चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते, त्यानुसार निवडणूक अध्यासी अधिकारी ए. पी. बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३०) सरवली ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी दिनकर राज ठाकरे व सोनम संतोष पाटील यांचे सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले होते. यावेळी १५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दिनकर ठाकरे यांना आठ मते मिळाल्याने त्यांची सरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची निवड होताच त्यांना मतदान करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे सर्व सहकारी व ठाणे जिल्हा काँग्रेस आय अध्यक्ष दयांनद चोरघे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com