प्रवीण गुप्ता यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीण गुप्ता यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

विरार, ता. १ (बातमीदार) : भाजप वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पालघर जिल्हा प्रभारी राणी द्विवेदी, भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, भाजप ज्येष्ठ नेते केदारनाथ म्हात्रे, भाजप बोईसर विधानसभाप्रमुख माजी आमदार विलास तरे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुनील किणी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी मी झोकून कार्य करेन, अशी ग्वाही या वेळी गुप्ता यांनी दिली. ओबीसी मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी विश्वंभर चोपडेकर यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या गुप्ता यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com