कर्जतवासीयांचा लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार

कर्जतवासीयांचा लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार

कर्जतवासीयांचा लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार
घनकचरा प्रकल्प हटविण्याची मागणी, संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा
नेरळ, ता. १ (बातमीदार) : कर्जत नगर परिषदेच्या अखत्यारित असलेला घनकचरा प्रकल्पाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचे गठण करण्यात आली आहे. तर या समितीच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्प हटवण्यासाठी अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली. मात्र, नागरिकांचा हा विषय मार्गी न लागल्याने अखेर नगर परिषद हद्दीतील गुंडगे गावअंतर्गत पंचशिल नगर, संत रोहिदास नगर, परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदनसुद्धा घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रायगडच्‍या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्‍यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडचा येथील स्थानिकांना त्रास होत आहे. परिसरात रोगराई पसरली आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. या घाणीमुळे परिसरातील विकास खुंटला असल्‍याचा आरोप करण्यात येत आहे. तरीही कर्जत नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्‍याने रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. परिसरातील डम्पिंग ग्राऊंड पर्यायी जागेवर हालवण्यात यावे, याकरिता घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्‍या माध्यमातून कर्जत नगर परिषद कार्यालयावर १२ जानेवारी २०२३ रोजी भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याचबरोबर कर्जत नगर परिषदेबरोबर सतत पत्रव्यवहारदेखील करण्यात येत आहे. तसेच कर्जत- खालापूर विधानसभेचे आमदार यांनादेखील समितीकडून सदरील कचरा प्रकल्‍प हटवण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय रायगड जिल्हा अधिकारी यांच्‍याशीदेखील १८ मार्च २०२४ रोजी लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु सदरील प्रश्नाकडे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्‍याने ग्रामस्‍थांकडून रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. या कचरा प्रकल्पामुळे गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्‍यामुळे गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांनी आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर जाहीर बहिष्कार टाकला आहे. १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिक मतदान करणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना सदरील निवेदन देण्यात आले आहे. यासह निवेदनात सात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास नागरिकांचा या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार असेल, असे समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.
........................
गुंडगे गावातील डम्पिंग ग्राऊंड हटवण्याच्‍या संदर्भात आम्ही घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेवर गेल्यावर्षी मोर्चा काढला होता. त्याचबरोबर वेळोवेळी त्यांना निवेदन दिले आहेत; परंतु तरीदेखील कर्जत नगर परिषद याकडे लक्ष देत नसल्याने आम्हाला यंदाच्‍या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय शिल्लक राहिलेला आहे. म्हणून आम्ही गुंडगे परिसरातील पंचशील नगर, संत रोहिदास नगरमधील रहिवासी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहोत.
- महेंद्र कानिटकर, अध्यक्ष, घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समिती
...........................
निवेदनातील मागण्या
१. गुंडगे येथील सर्व्हे नं. ६० मधील शासकीय जागेतील डम्पिंग ग्राऊंड हटविण्यात यावे.
२. या कचरा प्रकल्‍पातून दररोज दुर्गंधी सुटत आहे, ती तत्काळ थांबविण्याची व्यवस्था करावी.
३. परिसरात डासांचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे तत्काळ उपाययोजना करावी.
४. डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरात कर्जत शहरातील बायोगॅससारखा प्रकल्प आणू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com