१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास सूट

१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास सूट

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : यंदाच्या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके १ एप्रिलला तयार केली असून त्याची लिंक करदात्यांना एसएमएसने पाठवण्यात आली आहे. तसेच, मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. करदात्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महापालिकेकडे १५ जूनपर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करावर १० टक्के सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासने दिली आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह महापालिकेकडे जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जूनपर्यंत कर भरल्यास १० टक्के, ३० जूनपर्यंत चार टक्के, ३१ जुलैपर्यंत तीन टक्के आणि ३१ ऑगस्टपर्यंत करभरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. मालमत्ता कराची देयके एसएमएस व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठविण्यात आली आहेत. याला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादाबाबत महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत. तसेच आता मालमत्ता कराची देयके प्रिंट करून आता करदात्यांपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. तसेच propertytax.thanecity.gov.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध आहेत. याद्वारे कर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सूट देण्यात आल्याचा तपशील
कालावधी सूट (टक्केवारीत)
१ एप्रिल ते १५ जून १०
१६ जून ते ३० जून ४
१ जुलै ते ३१ जुलै ३
१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २

कर संकलन केंद्रे सुरू
महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत तसेच शनिवारी व सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, मालमत्ताधारक आपला मालमत्ता कर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने भरणा करू शकतात. तसेच गुगल पे, फोन पे, भीम ॲप, पेटीएममार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात. ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com