मुंबई- गोवा महामार्गावर सफेद कांद्यांची विक्री

मुंबई- गोवा महामार्गावर सफेद कांद्यांची विक्री

मुंबई- गोवा महामार्गावर सफेद कांद्यांची विक्री
गुणकारी असल्याने पर्यटकांकडून पसंती; स्‍थानिकांना रोजगाराची संधी
पेण, ता. १ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावरील वाशीनाका येथील मार्गावर अलिबागच्या सफेद कांद्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते पेणदरम्यानच्या पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाल्याने पळस्पे फाट्यापासून ते पेण, वडखळपर्यंत अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक शेतकरी महामार्गाच्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर स्‍थानिक भाज्‍यांची विक्री करताना दिसून येत आहेत. यामध्ये अलिबागच्या सफेद कांद्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सफेद कांदे हे गुणकारी असल्याने महामार्गावरून येणाऱ्या अनेक प्रवासी याची खरेदी करताना दिसत आहेत. पेण तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, उचेडे, कांदळे, रामवाडी येथील अनेक महिला, पुरुष मंडळी याठिकाणी रोजगाराच्या दृष्टिकोनातून गावठी भाज्या, सुकी मासळी, ओली मासळीसह मोठ्या प्रमाणावर सफेद कांद्यांची विक्री करताना दिसून येत आहे. वाशीनाका हा खवय्यांसाठी आता महत्त्‍वाचा थांबा झाला आहे. मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणात तसेच मुंबईकडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर येथे सफेद कांद्यांची खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.
...........................
पेण वाशीनाका हा भाग मुख्य महामार्गाला मिळत असल्याने येथे चार रस्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांसह नागरिकांची ये- जा मोठ्या प्रमाणावर होते. येथे स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर सफेद कांद्यांसह अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवले आहेत. त्‍यांना रोजगारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबांचे उदरनिर्वाह होत आहे.
-मारुती जाधव, व्यावसायिक
.........................

फोटो : पेण वाशी नाका येथे सफेद कांद्यासह इतरही वस्तूंची विक्री करण्यासाठी बसलेले स्थानिक व्‍यापारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com