साडेसात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड

साडेसात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड

साडेसात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधाम गजाआड
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : उलवे भागात शेजारी राहणाऱ्या साडेसात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संदेश पाटील ( वय ४०) असे या व्यक्तीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील अटक आरोपी संदेश पाटील हा उलवे भागात राहण्यास असून त्याने अत्याचार केलेली साडेसात वर्षांची मुलगी त्याच्या शेजारी राहण्यास आहे. पीडित मुलगी संदेश पाटील याच्या घरामध्ये बुद्धिबळ खेळण्यासाठी गेली असताना, आरोपी संदेश पाटील याने तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितली. नंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ एनआरआय पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संदेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, या नराधमाने दोन वर्षांपूर्वी देखील त्याच्या घरामध्ये कुणीही नसताना पीडित मुलीला आपल्या घरामध्ये बोलावून तिला आपल्या मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अश्लील व लैंगिक चाळे केल्याचे उघडकीस आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com