भरधाव रिक्षाची उभ्या वाहनाला धडक; चालकाचा मृत्यू, महिला प्रवासी जखमी

भरधाव रिक्षाची उभ्या वाहनाला धडक; चालकाचा मृत्यू, महिला प्रवासी जखमी

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : भरधाव रिक्षा सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू, तर महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघाताला मृत रिक्षाचालक जबाबदार असल्याचे आढळून आल्याने रबाळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील मृत रिक्षाचालकाचे नाव गोवर्धन भगवान करपे (वय ५०) असे असून ते शिळफाटा येथे राहण्यास होते. मंगळवारी दुपारी करपे हे ऐरोली सेक्टर-१० मध्ये राहणाऱ्या महिला प्रवासी पूजा शिंदे (वय ३४) यांना आपल्या रिक्षामधून घेऊन जात होते. यावेळी ऐरोली सेक्टर-८ मधील सिग्नल लागल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येणारी करपे यांची रिक्षा पुढे उभ्या असलेल्या वाहनावर जोरात धडकली. या अपघातात करपे व महिला प्रवासी दोघेही जखमी झाले. दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान करपे यांचा मृत्यू झाला. या अपघातात करपे यांनी भरधाव रिक्षा चालवून नेल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू, तर महिला प्रवासी जखमी झाल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी मृत रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com