संजय निरुपम शिंदे गटात

संजय निरुपम शिंदे गटात

संजय निरूपम शिंदे गटात
मुंबई, ता. १ : काँग्रेस पक्षाने सहा वर्षे निलंबनाची कारवाई केलेले संजय निरूपम आता पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ही आपली घरवापसी असणार असल्याचे ते म्हणाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर येत्या दोन-तीन दिवसांत शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याचे म्हटले आहे. १९९६ मध्ये संजय निरूपम शिवसेनेचे खासदार होते.
संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरूपम यांनी पुढे काय करायचे यावर विस्तृत चर्चा झाली. शुक्रवारी शिवसेना( शिंदे गटात) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती देताना पुढील माहिती पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरूपम यांनी सांगितले. निरूपम हे उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र, शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबईत किंवा राज्यात जे मतदार आहेत, त्यांचा जोरदार प्रचार करणार असल्याचे सांगतिले. २० वर्षांनंतर ही माझी घरवापसी आहे, असेही निरूपम यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com