शाहू महाराजांना विजयी करा

शाहू महाराजांना विजयी करा

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१ : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन समाजवादी पक्षाने (सपा) केले आहे. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पत्रातून कोल्हापूर परिसरातील समाजवादी पक्षाच्या कार्यर्त्यांना आवाहन केले आहे.
महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे. उच्चवर्णियांच्या सर्वंकष गुलामगिरीतून महाराष्ट्रातील बहुजनांची मुक्तता राजर्षी शाहू महाराज यांनी केली. देश आज निर्णायक वळणावर उभा आहे. तोच वसा जिवंत ठेवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीच्या आग्रहास्तव उमेदवारी स्वीकारली आहे. कोल्हापूर शहराला हिंदू-मुस्लिम ऐक्याची महान परंपरा आहे. अलिकडच्या काळात उसवत चाललेली सामाजिक-धार्मिक वीण कोल्हापूरकरांसाठी चिंतेचा विषय आहे. थेट छत्रपतींचा वारसा असणारी, ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वमान्य आहे, असे उमेदवार कोल्हापूरकरांना लाभले आहेत. आपल्या शहराची उज्वल पुरोगामी परंपरा कायम राखण्यासाठी शाहू महाराज लोकसभेत जाणे अगत्याचे आहे, असे आवाहन आमदार रईस शेख यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com