ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?
Palghar News:sakal

Palghar News: ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?

Palghar Loksabha News: पालघर मतदारसंघातून महायुतीत उमेदवार ठरता ठरत नव्हता. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना आज हा मतदारसंघ पाच वर्षांनंतर पुन्हा भाजपकडे येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपच्या गटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?
Palghar Loksabha: अर्ज दाखल करण्याची तारीख येऊनही महायुतीचा ऊमेदवार ठरेना; कार्यकर्ते संभ्रमात  

हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जात होता. हा मतदारसंघ निर्माण झाल्यावर झालेली पहिली निवडणूक बहुजन विकास आघाडीने जिंकली होती; परंतु त्यांतर मात्र या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणाहून पुन्हा राजेंद्र गावित हेच उमेदवार असल्याची घोषणा निवडणुका जाहीर झाल्यावर केली होती.

त्यावेळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता. आता भाजप पुन्हा राजेंद्र गावित यांची घरवापसी करून त्यांना उमेदवारी देणार की नवीन नावाची घोषणा करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?
Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भीषण समस्या

यातच देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्तीय असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमाला राजेंद्र गावित यांनी हजेरी लावल्याने तसेच दोन दिवसांपूर्वी गावित यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने गावित पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?
Palghar Loksabha: पालघरमध्ये चौरंगी लढतीची शक्यता? महायुतीचा तिढा सुटेना, बहुजन विकास आघाडीचा ऊमेदवार गुलदस्त्यात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com